शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागालाच शिक्षक बदल्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:04 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शासनाने ५१ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करून नाशिक जिल्ह्णात पाठविले, तर जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देघालमेल : ७१ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शासनाने ५१ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करून नाशिक जिल्ह्णात पाठविले, तर जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून आॅनलाइन करण्यात येणार असल्याने मंगळवारपासून शासनाकडून आदेशाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा १७ जूनपासून सुरू होणार असून, तत्पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र आता शासनस्तरावरूनच बदल्यांचे आदेश जारी होत नसल्याने शिक्षकांचीही घालमेल वाढली आहे. खुद्द शिक्षण विभागदेखील बदल्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असून, त्यामुळे पुढची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने ५१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने नाशिकला पाठविले असून, नाशिक जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांच्या नेमणुका रिक्त जागांवर करण्यात येणार असून, बदल्यांची संपूर्ण प्रकिया पार पडल्यानंतरच ही कार्यवाही होणार आहे.सैनिक पत्नीची सोलापूरला बदलीसैन्य दलात असलेल्या जवानाच्या शिक्षक पत्नीला तिच्या पतीच्या मूळ गावी आंतरजिल्हा बदली देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार शुक्रवारी नाशिक जिल्हा परिषदेच्या नांदगाव तालुक्यातील मळगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मनीषा निकम यांची सोलापूर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करून त्यांना कार्यालयात बोलावून बदलीचे आदेश दिले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली