शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समृद्धीच्या मोजणीत उपग्रह नकाशांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:20 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देताना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकºयांनी पडीक जमिनी सुपीक करण्याबरोबरच जागेवर पोल्ट्री शेड उभारून मूल्यांकन वाढविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपग्रहाद्वारे जमिनींचे नकाशे गोळा करण्याचे ठरविले असले तरी, महिना उलटूनही त्यात यश आलेले नाही. उलटपक्षी सिन्नर तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये प्राथमिक मोजणी झालेली आहे अशा गावांमध्ये शेडच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच ते अधिकृत करून घेण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे.

ठळक मुद्देपोल्ट्री शेड कायम वाढीव मूल्यांकनाचे प्रयत्न जोरात

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देताना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकºयांनी पडीक जमिनी सुपीक करण्याबरोबरच जागेवर पोल्ट्री शेड उभारून मूल्यांकन वाढविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपग्रहाद्वारे जमिनींचे नकाशे गोळा करण्याचे ठरविले असले तरी, महिना उलटूनही त्यात यश आलेले नाही. उलटपक्षी सिन्नर तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये प्राथमिक मोजणी झालेली आहे अशा गावांमध्ये शेडच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच ते अधिकृत करून घेण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे.नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४९ गावांतील सुमारे १२०० हेक्टर जमीन संपादित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रारंभी या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध करणाºया शेतकºयांनी नंतर मात्र जमिनीला पाचपट मोबदला मिळत असल्याचे पाहून संमती देण्यास सुरुवात केली असून, त्यातूनच आजवर सुमारे ५४ टक्के जमिनीचे संपादन थेट खरेदीद्वारे करण्यात आले आहे. शासनाकडून जमिनीच्या मोबदल्याबरोबरच शेतकºयांच्या शेतातील घर, गोठा, झाडे, विहीर, पाइपलाइन आदी गोेष्टींचेही मूल्यांकन करून त्याचीही वेगळी भरपाई दिली जात असल्याचे पाहून सिन्नर तालुक्यातील मालढोण, पाथरे, वारेगाव, शिवडे आदी गावांतील काही शेतकºयांनी पडीक जमिनीला रातोरात बागायती करण्याबरोबरच शेतात पाइपलाइन टाकल्या आहेत, तर काहींनी पोल्ट्री शेड उभारले आहेत. त्यासाठी काही एजंट शेतकºयांच्या भेटी घेऊन त्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपले कमिशन काढण्याचा उद्योग करीत आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्यावर प्रशासनानेही या वृत्तास दुजोरा देत समृद्धी मार्गावरील जमिनींचे उपग्रहाद्वारे जुने नकाशांचा आधार घेऊनच शेतकºयांना मोबदला देण्याचे जाहीर केले होते. महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ‘मोनार्च’ या खासगी कंपनीची या कामी नेमणूक केली असून, प्रशासनाने या कंपनीशी संपर्क करून सिन्नर तालुक्यातील संबंधित गावांचे नकाशे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.उदासीनताही संशयास्पद कंपनीने दिलेल्या काही नकाशांचे चित्रे धूसर असल्याने त्यातून अंदाज बांधणे कठीण झाले आहे. नव्याने नकाशांची मागणी केलेली असली तरी, महिना उलटूनही ते उपलब्ध झालेले नाहीत, दुसरीकडे वाढीव मूल्यांकनासाठी सुरू असलेले शेतकºयांचे व दलालांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. प्रशासनाची याकामी असलेली उदासीनताही संशयास्पद असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.