शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक वनपरिक्षेत्राला ‘आरएफओ’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:03 IST

वनविभाग पश्चिम अंतर्गत येणारे नाशिक वनपरिक्षेत्र मागील आठ महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) प्रतीक्षेत आहे.

नाशिक : वनविभाग पश्चिम अंतर्गत येणारे नाशिक वनपरिक्षेत्र मागील आठ महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) प्रतीक्षेत आहे. प्रशासकीय गलथान कारभारामुळे या रिक्त पदावर अद्याप स्वतंत्ररीत्या अधिकारी नियुक्त करण्यास वनविभागाला यश आलेले नाही. शहरी भागाचा समावेश असलेल्या नाशिक परिक्षेत्र अतिसंवेदनशील मानले जाते. यामुळे या परिक्षेत्राकरिता स्वतंत्र ‘आरएफओ’ची गरज भासते. येथील स्वतंत्र आरएफओ यांची सामाजिक वनीकरण विभागात बदली होऊन तेथे ते रुजू होऊन आठ महिने उलटले आहे तरीदेखील येथील पद रिक्त असून, प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.बिबट्याचा लोकवस्तीत प्रवेश असो किंवा गांडूळपासून मगरीच्या पिलांच्या तस्करीपर्यंतचे गुन्हे नाशिक परिक्षेत्रांतर्गत घडल्याचा मागील इतिहास आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राची हद्दही मोठी असून, शहरी भागासह शहराजवळच्या खेड्यांचाही यामध्ये समावेश होतो. यामुळे उसाची शेती असलेला मळे परिसरदेखील भरपूर प्रमाणात आहे. यामुळे बिबट्याचा नागरी वस्तीत अधिवास, पशुधनावर हल्ल्यासह नागरिकांना जखमी करण्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. तसेच मोर, गिधाड, तरस, रानमांजर यांसारखे वन्यजीवदेखील अनेकदा जखमी अवस्थेत या परिक्षेत्रात आढळून येतात. एकूणच परिक्षेत्रामधील घटना घडामोडी वेगवेगळ्या प्रकारच्या असून या भागासाठी स्वतंत्ररीत्या वनपरिक्षेत्र अधिकारी तत्काळ नियुक्त करण्याची गरज आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांची सामाजिक वनीकरण विभागात बदली होऊन आठ महिने झाले आहे, तरीदेखील अद्याप त्यांच्या रिक्त पदावर स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला गेला नाही.स्वतंत्र परिक्षेत्र अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायमपश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) हे महत्त्वाच्या पदाचा कार्यभार मागील आठ महिन्यांपासून ननाशी परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विभागाचे कार्यालय शहरात व ननाशीचा परिसर येथून सुमारे दीड तासाच्या अंतरावर आहे. मागील आठ महिन्यांपासून स्वतंत्र परिक्षेत्र अधिकाºयांची प्रतीक्षा कायम आहे.थकबाकीदारांची यादीत्यासाठी महापालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, यात पाच हजार ते नऊ हजार ९९९ रु पयांपर्यंतचे थकबाकीदार २०,०३४, १० हजार ते १४,९९९ रु पयांचे थकबाकीदार १०,६७७, १५ हजार ते २४,९९९ रु पयांपर्यंतचे थकबाकीदार ५०३३ व २५ हजार रु पयांच्या वरील थकबाकीदार १९९७ अशी थकबाकीची स्थिती आहे. सामान्यत: महापालिकेत डिसेंबर महिन्यापासून थकबाकी वसुली मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मात्र नव्या आर्थिक वर्षाच्या शुभारंभानंतरही मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक