शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वडाळागावातील  रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:33 IST

वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते. गावात सुमारे दहा हजार लोकसंख्या आहे तसेच काही अंतरावरच राजीवनगर झोपडपट्टी असून, हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विविध आजारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा जाकीर हुसेन रुग्णालय येथे ये-जा करावी लागते. त्यासाठी रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत असल्यामुळे मजुरी करणा-यांना मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागते. सुमारे पंचवीस वर्षांपासून मनपा रुग्णालयाची प्रतीक्षा नागरिकांना होती. अखेर रहिवाशांच्या मागणीची दखल व आवश्यकता लक्षात घेत शंभर फुटी रस्त्यालगत महापालिकेचे रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यानुसार रुग्णालयाचे बांधकाम एक वर्षापूर्वी पुन्हा करण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत रुग्णालयाचे लोकार्पण झाले नाही. काही किरकोळ कामाअभावी लोकार्पण होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णालय शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.सभागृहाची देखभालीअभावी दुरवस्थाकाही औषधे अशी आहे की ती सरकारी रुग्णालयातच मिळतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मनपा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगतच मनपानेच बांधलेल्या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. चोरट्यांनी दारे, खिडक्या नेणे सुरू केले आहे. तसेच सभागृहात गाजरगवत व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने खंडराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. त्याची पुनरावृत्ती मनपा रुग्णालयाबाबत होऊ नये.  गेल्या पंधरा दिवसांपासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायाच्या सांधेदुखीने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. गावातील मनपाचे रु ग्णालय सुरू झाले असते तर रुग्णांची सोय झाली असती असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच गावातील उघड्या गटारींमुळे नेहमीच साथीचे आजार पसरत असतात.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका