शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या विधी, शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:58 IST

नाशिक - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.सत्ताधारी भाजपाने आपल्या जास्तीत जास्त सदस्यांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून विधी, आरोग्य ...

नाशिक - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.सत्ताधारी भाजपाने आपल्या जास्तीत जास्त सदस्यांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्या नव्याने गठित करण्यात आल्या. आरोग्य समितीच्या सभापतीपदाची धुरा सतिश कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापतीपदी भगवान दोंदे तर विधी समिती सभापतीपदी शीतल माळोदे सांभाळत आहेत. महासभेने या समित्यांना १० लाखापर्यंत खर्चाचे अधिकार दिले असले तरी नगरसचिव विभागाने त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये या तिनही समित्यांच्या पहिली बैठक घेण्यात आली. त्यात, विधी समितीची सभा २२ आॅगस्टला तर शहर सुधार समितीची ८ आॅगस्टला सभा झाली. परंतु, त्यानंतर समितीपुढे एकही प्रस्ताव प्रशासनाकडून प्राप्त न झाल्याने दुसºया सभेला मुहूर्तच लाभू शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही सभापती केवळ कक्षापुरतेच मर्यादित ठरले आहेत. आरोग्य समितीचे सभापती सतिश कुलकर्णी यांनी मात्र सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतल्याने समितीच्या आतापर्यंत तीन सभा पार पडल्या आहेत शिवाय, समितीच्या सदस्यांनी रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी दौरेही केले आहेत. विधी व शहर सुधार समितीला मात्र अद्याप प्रशासनाने ताकास तूर लागू दिलेला नाही. विषय कोणते द्यायचे, याच गोंधळात प्रशासन अडकले आहेत. त्यामुळे समितीचे सभापतीही आपल्या कार्यकक्षांबाबत संभ्रमित आहेत.