शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेठेनगर यू-टर्नच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:11 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.  वाहनचालकांच्या सोयीसाठी होत असलेल्या या कामाला होत असलेला विरोध मोडून काढण्याचे पोलिसांनी ठरविल्याने गणेश विसर्जनानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावरून धावणाºया वाहनांनासाठी उड्डाणपुलाची सोय करण्यात आली असली तरी, सिडको व इंदिरानगर या दोन्ही भागात ये-जा करण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग तयार करूनही या मार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे. त्यातूनच इंदिरानगर बोगदा तयार करण्यात आला, परंतु त्यातूनही प्रश्न सुटत नसल्याने आता सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पेठेनगर ते लेखानगर या दरम्यान उड्डाणपुलाखालून दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना ये-जा करण्याची सोय केल्यास अन्य भुयारी मार्गावर वाहनांचा पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पुलाच्या खालील पिलर क्रमांक पाच व सहा या दोघांच्या मधून यू टर्न करण्याच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीच सदरचे काम सुरू करण्याचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला होता. परंतु लेखानगर समोरील काही रहिवाशांनी या कामाला विरोध दर्शवून राजकीय वजन वापरल्यामुळे काम थंड बस्त्यात पडले. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सुंदरबन कॉलनीजवळ उड्डाणपूल ओलांडत असताना दोघा माय-लेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पेठेनगर यू टर्नच्या कामाने उचल खाल्ली आहे.१५ तारखेनंतर काम सुरू होणारस्थानिक नागरिकांनी लेखानगरच्या पिलर क्रमांक ३ येथून यू टर्नचे काम सुरू करावे, असा आग्रह धरला आहे, तथापि तसे केल्यास या महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा या कामाला असलेला विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. पोलिसांनी गणेश विसर्जनानंतर बंदोबस्त देण्याचे ठरविल्याने १५ आॅक्टोबरनंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक