शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील बोलक्या भिंतींची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:07 IST

सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपीकरणात भर घालत आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा घाट : सांकेतिक क्रमाकांमुळे विद्रुपीकरण

सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपीकरणात भर घालत आहेत.आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूका विविध माध्यमातून पार पाडल्या जातात. या निवडणूका पार पाडण्यासाठी व मतदानासाठी लागणारी यंत्रसामुग्री ठेवण्यासाठी खोल्यांची (बुथची) गरज असते. यासाठी प्रत्येक गावात असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेंच्या तसेच खाजगी शाळांमधील खोल्या मतदानासाठी वापरल्या जातात. या खोल्यांना त्या त्या वेळच्या असणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात विशिष्ट सांकेतिक नंबर दिले जात असत. पूर्वी शाळेच्या दरवाजावर एक छोटासा गोल करुन त्यामध्ये वॉर्ड नंबर व मतदारसंघांचा नंबर दिला जात होता. त्यामध्येही नंतर वाढ होऊन दोन दोन गोल व त्यामध्ये वॉर्ड नंबर व मतदार संघाचे नाव लिहण्यात येऊ लागले.परंतु अलीकडच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मतदान हे इन कॅमेरा किंवा सीसीटीव्ही लावून होऊ लागले . त्यामुळे खोलीच्या दरवाजावरील लिखाण हे दरवाजे उघडे असल्या कारणाने दिसून येत नाही म्हणून सदर क्रंमांक हे भिंतीवर लिीहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आकर्षक रंगरंगोटी करून सजवलेल्या भिंतीवर या सांकेतीक गोलांचे व अक्षरांचे आक्रमण झाले व या भिंतींच्या चित्रांवरच वॉर्ड नंबर, मतदार संघ क्रमांक रंगवले गेले.बोलक्या भिंतीची वाट लागलीशाळेतील शिक्षकांनी मोठ्या कष्टाने सचित्र बनवलेल्या या बोलक्या भिंतींना जास्तच विद्रूपता आली आहे. बाल वयात मुलांना शिक्षणासोबत आता निवडणूकीच्या पाट्या वाचण्याची वेळ आली आहे. निवडणूकीसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या निवडणूक आयोगाकडून शाळेंच्या असलेल्या या बोलक्या भिंतींना विचित्र दिसण्यापासून वाचवण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.महापुरुषांची ओळख, त्यांचा इतिहास तसेच समाज सुधारण्याचे संदेश शाळेच्या भिंतीवर लिहून एक सर्वच शाळांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. शाळेला येणारा निधी, लोकवर्गणी यामधून अनेक ठिकाणी शाळेच्या भिंती बोलक्या केल्यात, पण निवडणुकीत बोलक्या भिंतीची पार वाट लागली आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सायखेडा.शाळेच्या बोलक्या भिंती शासकीय अनुदान, तर काही ठिकाणी लोकवर्गणीतून केल्या आहेत. निवडणूक काळात सूचना फलक कलरने केले जातात, ते तात्पुरते स्वरूपात असावेत अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहेत.- सिंधूबाई गीते, उपसरपंच, शिंगवे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग