शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

’काकस्पर्श‘ होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:23 IST

देवगाव : आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागात पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. श्रध्येने प्रत्येक घरात श्राद्ध घातले जातात. मात्र, पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही आठवण येत नाही. परंतु या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी घरोघरी कावळ्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देदेवगाव : पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता

देवगाव : आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागात पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. श्रध्येने प्रत्येक घरात श्राद्ध घातले जातात. मात्र, पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही आठवण येत नाही. परंतु या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी घरोघरी कावळ्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जपली जात आहे. पितरांना आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ आमवस्येला त्याची सांगता केली जाते. या पितृपंधरवाड्याच्या दरम्यान, आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार घास देण्याची प्रथा परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्त्व प्राप्त होते. कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बर्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहेत. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पितृपंधरवड्यात खाऊन सुतावलेला दिसून येतो. मात्र, सद्या या कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या घासला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बर्याचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षRural Developmentग्रामीण विकास