शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शहिदांना खऱ्या अर्थाने वाहिली श्रद्धांजली : वीरपत्नींचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:52 IST

‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.

नाशिक : ‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. भारतमातेच्या रक्षणार्थ आजपर्यंत ज्या सुपुत्रांनी आपले बलिदान दिले आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.’’ अशा शब्दांत शहरासह जिल्ह्यातील वीरपत्नींनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.पुलवामामध्ये भारताने ४० शूरवीर जवान गमावले. त्यांचे ४० कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. या हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला होता. या हल्ल्यानंतर देशातून एकच नारा बुलंद केला जात होता, तो म्हणजे ‘धडा शिकवा, बदला घ्या’. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बचा वर्षाव करत तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष आणि वायुसेनेचे अभिनंदन सुरू झाले. हुतात्म्यांच्या वीरपत्नींशी संवाद साधला असता त्यांनीही या कारवाईचा अभिमान बाळगून भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत आभार मानले. पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला, असेही त्यांनी सांगितले.भारत सरकारने याअगोदर जर आदेश दिले असते तर अशी कारवाई खूप अगोदरच सेनेकडून झाली असती; मात्र देर आये दुरुस्त आये, याप्रमाणे वायुसेनेला जे आदेश सरकारने दिले व सेनेने ज्या पद्धतीने शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला तो अभिमानास्पद आहे. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय.- कविता वसंत लहाने, वीर जवानाची कन्यामनस्वी आनंद झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वायुसेनेने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. भारतासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना खºया अर्थाने वायुदलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याच्या रुपाने पाकला ठोस उत्तर मिळाले आहे. अशा प्रकारच्या कारवाई यापूर्वीच होणे आवश्यक होते.- रूपाली बच्छाव, वीरपत्नी, सातपूरजगातील चौथ्या क्रमांकाचे वायुदल म्हणून भारतीय वायुसेनेची ओळख आहे. त्यांची ताकद आज अवघ्या जगाने अनुभवली. सरकारने भारतीय सेनेच्या तीनही दलांचे हात असेच मोकळे ठेवावे, जेणेकरून घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांना जवान यमसदनी धाडतील आणि देश अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा हवाई हल्ला पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडलेल्या अतिरेक्यांना खूप काही शिकवून गेला असावा. - रेखा खैरनार, वीरपत्नी, गंगापूररोडभारताने केलेला हा हवाई हल्ला दहशतवादाची पाळेमुळे नेस्तनाबूत करणारा ठरला. या हल्ल्यामुळे शाहिदांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. भारताच्या सैन्याविषयी अन्य देशांनी जे गैरसमज करून ठेवले आहेत, त्यांचे गैरसमजही दूर झाले असतील. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवायांची गरज आहे. काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारताकडेच राहणार आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. - सुषमा मोरे, वीरपत्नी, पाथर्डी फाटाएकास दहा हे समीकरण अचूक आहे. असेच समीकरण जर कायम ठेवले तर पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेले दहशतवादी देशाकडे वाकडी नजर करणार नाही. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्याची कारवाई अत्यंत अवघड होती; मात्र वायुदलासह भारतीय सेनेच्या शब्दकोशात ‘अवघड‘, ‘अशक्य’ हे शब्दच नसल्याचे यावरून पुन्हा सिध्द झाले.- अश्विनी तनपुरे, शहीद जवानाची पुतणी, गंगापूररोडशहिदांना खºया अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. जवानांच्या आत्म्यांना या हल्ल्यामुळे शांती मिळाली. देशाकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठा धडा मिळाला आहे. अशाप्रकारची कारवाई याअगोदरच झाली असती तर देशासाठी व सेनेसाठी चांगले झाले असते. भारतीय सेनेला सरकारने स्वतंत्र निर्णय घेऊ द्यावेत.  - यशोदा गोसावी, वीरपत्नी

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक