शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
4
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
5
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
6
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
7
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
8
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
9
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
10
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
11
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
12
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
13
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
14
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
15
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
16
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
17
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
18
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
19
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
20
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Daily Top 2Weekly Top 5

वाघमारे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:41 IST

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाऱ्या  लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी सभागृहात प्रचंड गदारोळ होऊनही वाघमारे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरूअजूनही आक्षेपाहार्य शब्दप्रयोग करीत असल्याची चर्चा

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाऱ्या  लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी सभागृहात प्रचंड गदारोळ होऊनही वाघमारे हे अजूनही आक्षेपाहार्य शब्दप्रयोग करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या ल. पा. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी प्रचंड तक्रारी असल्याने आणि त्यांच्यावर गैरवर्तणुकीसंदर्भात तीन विभागीय चौकशा सुरू असतानाही वाघमारे अद्यापही आक्षेपाहार्य विधाने करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण सभागृहाने एकमताने वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव संमत केला आहे. असे असतानाही वाघमारे यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी देण्यात आलेली नाहीच या उलट त्यांनी आपले काहीच होऊ शकत नसल्याचा पवित्रा घेत कार्यमुक्त ठरावाची खिल्ली उडविण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जात आहे.वाघमारे यांनी सर्वधारण सभेच्या सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात आपणाला काहीच माहिती नसल्याचे आणि आपल्याच सहीच्या पत्राबाबत दाखविलेल्या बेजबाबदारपणामुळे सदस्य आक्रमक झाले होते. त्यांनी वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली असता अध्यक्ष शीतल सांगळे यांनी वाघमारे यांच्या कार्यमुक्तीचा ठराव मांडला. या निर्णयामुळे वाघमारे यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे वाटत असताना अद्याप त्यांना कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे समजते. वाघमारे यांच्याविषयीचा ठराव आणि त्यांच्या वर्तणुकीविषयी यापूर्वी झालेल्या तक्रार अर्जांची माहिती विभागीय आयुक्तांना सादर केली जाणार असल्याचेही समजते.वाघमारे यांच्याविषयी सभागृहाने केलेल्या ठरावाची प्रत आणि त्या संदर्भातील मागणीपत्र विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार असून, त्यानंतर विभागीय आयुक्त योग्य तो निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान, सभेचे इतिवृत्त बनविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश कर्मचाºयांना देण्यात आले आहे. जोपर्यंत विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार नाही तोपर्यंत वाघमारे यांच्यावरील कारवाईदेखील टळणार आहे. मात्र आता वाघमारे यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद