शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वडाळारोडवर गटारगंगा

By admin | Updated: May 30, 2016 23:55 IST

पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 नाशिक : महिनाभरापासून वडाळा रोडवर रहनुमा उर्दू शाळेपासून थेट नासर्डी पुलापर्यंत रस्त्यावर गटारीचे सांडपाणी दिवसभर वाहत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सकाळपासूनच येथील भूमिगत गटारीचे चेंबर ओसंडून वाहण्यास सुरुवात होते. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना येथून मार्गक्रमण करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. तसेच सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या वाहनांमुळे पायी किंवा दुचाकीवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर सांडपाणी उडून गणवेश खराब होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. मागील महिनाभरापासून या रस्त्यावर गटारगंगा वाहत असून, याकडे महापालिकेच्या भुयारी गटार दुरुस्ती विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रार करूनदेखील चेंबरची दुरुस्ती केली जात नसल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. सांडपाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने गटार दुरुस्त करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. गटारीचे सांडपाणी दिवसभर वाहत असून नासर्डी पुलानजीक असलेल्या निमुळत्या भागात जाऊन साचते. यामुळे पुलाजवळ सांडपाण्याचे डबके साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेच्या भुयारी गटार दुरुस्ती विभागाने तातडीने कायमस्वरूपी येथील तुंबलेल्या चेंबरची दुरुस्ती करून गटारीचे वाहणारे सांडपाणी थांबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.