शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

वडाळागावत पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून गूढ आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:58 IST

पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून वडाळागाव परिसरातील बहुतांश भागांमधील नागरिक हातापायांच्या पंज्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी हैराण झाले आहेत. पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाºया असह्य वेदना देणाºया गूढ आजाराने वडाळागावात थैमान घातले आहे.

नाशिक : पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून वडाळागाव परिसरातील बहुतांश भागांमधील नागरिक हातापायांच्या पंज्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी हैराण झाले आहेत. पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाºया असह्य वेदना देणाºया गूढ आजाराने वडाळागावात थैमान घातले आहे.  वडाळागाव परिसर नेहमीच सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चेत असतो. शहरापासून जवळ असलेल्या या भागात मागील काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या पांढºया पेशी, तांबड्या पेशी घटती संख्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे अचानक आलेल्या विषाणूजन्य तापाच्या आजाराने नागरिकांमध्ये दिसून येत होती. ही लक्षणे कमी होऊन ताप नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पंधरवड्यापासून लोकांना हाता-पायांचा पंजा आणि मनगट, घोटा, गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. वडाळागाव परिसरातील बारा खोली परिसर, रामोशीवाडा, माळी गल्ली, गोपालवाडी, राजवाडा, गरीब नवाज कॉलनी आदी भागांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळेच या आजाराने त्रस्त झाले आहेत.चिकुणगुण्यासदृश्य या आजारामध्ये नागरिकांचे सांधे जरी दुखत असले तरी ताप मात्र काहींना येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. एकूणच ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा उलट्या, अतिसारासारख्या दुसºया आरोग्याच्या तक्रारी नसताना केवळ हाताच्या बोटांची व पायांच्या बोटांची सांधेदुखी तसेच तळपायदुखी आणि गुडघेदुखीने वडाळावासीयांना ग्रासले आहेत.  या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडाभरापेक्षा अधिक वेळ वेदना थांबण्यासाठी लागत आहे. विषाणुजन्य आजारातून सांधेदुखीचा हा त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहेत; मात्र वेदनाशामक औषधांनीदेखील हा आजार नियंत्रणात येत नसून केवळ वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दिलासा रुग्णांंना मिळत आहे.घोट्याखाली सूजकाही रुग्णांमध्ये सांध्याच्या दाह व पायाच्या घोट्याला सूजही येत असल्याचे लक्षण दिसत आहे. सुरुवातीला किमान दोन दिवसांपर्यंत केवळ सांध्यांमध्ये दुखावा आणि त्यानंतर सूज येत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.बसल्या जागेवरून उठणे कठीणवडाळागाव परिसरातील बहुतांश नागरिकांना अचानकपणे उद्भवलेल्या सांधेदुखीने ग्रासले असल्याने बसल्या जागेवरुन उठणेही कठीण होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वडाळागाव परिसरात वैद्यकीय तपासणी कक्ष उभारून नागरिकांच्या या आजाराने निदान व योग्य उपचार करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे तत्काळ आरोग्य शिबिर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भागात राबविणे तसेच या आजारासह अन्य संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.झोपेतून उठताना जणू येते अपंगत्वरात्री झोपल्यानंतर सकाळी उठताना नागरिकांना प्रचंड प्रमाणात बोटांच्या सांध्यासह पायांच्या सांध्यात वेदना जाणवतात. काही वेळ तर गुडघ्यामधून पाय सरळ रेषेत करून उभे राहणेही शक्य होत नाही. नैसर्गिक विधी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सकाळची न्याहारी आटोपून वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर दिवसभर नागरिकांना दैनंदिन कामासाठी हालचाल करणे शक्य होते.वेदनाशामक गोळ्यांचा तात्पुरता प्रभावकेवळ हात आणि पायांच्या सांध्यामध्ये दाहचा होणारा त्रास थांबविण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली वेदनाशामक गोळ्या-औषधांचा प्रभाव तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. गोळ्या घेतल्यानंतर काही वेळेत दाह कमी होण्यास मदत होते; मात्र काही तासानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे-थे’ होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. अशी आहेत आजाराची लक्षणेसुरुवातीला टाचदुखीला सुरुवात.घोट्यापासून पायाच्या बोटांच्या सांध्यात असह्य वेदना.हाताच्या मनगटामध्ये दाह होणे तसेच बोटांची सांधेदुखी.गुडघ्याच्या सांध्यात प्रचंड वेदना होणे.तळपायाला सूज येणे.काही प्रमाणात रुग्णांना थकवाही जाणवतो.तळपायात जणू ताप असल्याचा भास होऊन उष्णता जाणवते.विषाणूजन्य आजार किंवा चिकुणगुण्यासदृश्य आजारामध्ये अशी लक्षणे दिसतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही या आजारावर औषधोपचार उपलब्ध आहे. जवळचे झाकीर हुसेन रुग्णालयात जाऊन योग्य उपचार घ्यावा. याबाबत परिसरात सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात येईल. - डॉ. जयराम कोठारी, आरोग्यधिकारी, मनपा

टॅग्स :doctorडॉक्टर