शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅक संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:29 IST

:वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडते.

नाशिक :वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडते.  टागोरनगर ते वडाळा म्हसोबा मंदिरापर्यंत सावता माळी पाट रस्त्यालगतच्या उजव्या कालव्याच्या जागेत सुमारे सहा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅक एका खासगी प्रायोजकाच्या माध्यमातून विकसित केला गेला; मात्र या जॉगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे कालांतराने काणाडोळा केला गेल्याने जॉगिंग ट्रॅकचे तीन तेरा वाजले आहे. जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचे कुंपण नाहीसे झाले आहे. तसेच पाटाच्या जागेवर तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरील माती नाहीशी होऊन ट्रॅकभोवती खड्डे पडले आहे. गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. जॉगिंग ट्रॅकवरील पथदीपांचे नुकसान झाले असून, काही पथदीप चोरट्यांनी गायब केले आहेत तर काहींचे दिवे फोडण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण परिसरच अंधारात हरविलेला असतो. यामुळे टवाळखोर, मद्यपी, भुरट्या चोरांचा येथे ठिय्या असतो. ओल्या पार्ट्या मद्यपींकडून रंगविल्या जातात; मात्र गस्तीवरील पोलिसांचे वाहन केवळ सरळ रस्त्याने मार्गस्थ होऊन प्रेमीयुगुलांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात.  दुचाकीवरून रात्री गस्तीवर असलेले पोलीस बीट मार्शलदेखील अनेकदा या ‘ट्रॅक’वर रात्री ‘विश्रांती’साठी येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. हा जॉगिंग ट्रॅक सुरक्षित करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी सातत्याने केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जॉगिंग ट्रॅकसाठी अत्यंत प्रशस्त जागा आहे. या ट्रॅकच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास आदर्श ट्रॅक उदयास येऊ शकेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक