शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:55 IST

नाशिक : व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु..., अशा एकापेक्षा एक सरस काव्यांच्या शब्दांना संगीताचे सूर लाभल्याने शब्द-सुरांचा अवीट संगम व्यंकटेश बालाजी मंदिरात उपस्थित भाविक श्रोत्यांनी अनुभवला.निमित्त होते, कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी संस्थानाच्या वेणुनाद संयुक्त विद्यमाने मंदिरात रविवारी (दि.२२) आयोजित ‘शब्द सूर संवाद’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पाचे. शहरातील ...

नाशिक : व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु..., अशा एकापेक्षा एक सरस काव्यांच्या शब्दांना संगीताचे सूर लाभल्याने शब्द-सुरांचा अवीट संगम व्यंकटेश बालाजी मंदिरात उपस्थित भाविक श्रोत्यांनी अनुभवला.निमित्त होते, कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी संस्थानाच्या वेणुनाद संयुक्त विद्यमाने मंदिरात रविवारी (दि.२२) आयोजित ‘शब्द सूर संवाद’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पाचे. शहरातील प्रसिद्ध मराठी कवींच्या काव्यांना संगीतबद्ध करत त्यांचे दर चार महिन्यांनी ‘शब्द सूर संवाद’ कार्यक्रमात गीतांच्या स्वरूपात सादरीकरणाचा उपक्रम बासरीवादक संगीतकार मोहन उपासनी यांनी हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या दुसºया पुष्प गुंफताना कवी किशोर पाठक यांच्या काव्यांना संगीतबद्ध करून त्या गीतांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.  यावेळी व्यंकटरमना देवा..., हे गीत गायक अशीष रानडे यांनी आपल्या दमदार आवाजात सादर क रून वातावरण भक्तिमय केले. यानंतर सुमारे आठ ते दहा काव्यरूपी गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. गायक ज्ञानेश्वर कासार, रसिका नातू, उपासनी यांनी आपल्या जादूई कंठाने उत्तरोत्तर मैफल खुलविली. त्यांना सतीश पेंडसे (तबला), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), शुभम जाधव (ºहीदम् मशीन) यांनी साथसंगत केली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले....हा तर बडतर्फीचा खलिता‘कुणी म्हणती जगणे आहे सुंदर कविता, तर कुणी म्हणती हा तर बडतर्फीचा खलिता’ ‘अरे जगणे म्हणजे धनादेश कोरा...शाई संपते स्वाक्षरी करता-करता’ या कविता सादर करत पाठक यांनी जगण्याचा अर्थ सांगणाºया कविता प्रारंभी सादर करत उपस्थित प्रेक्षकांना काव्याचे गीतामध्ये रूपांतर होताना शब्दांना सूर गवसतात आणि त्या कवितेचे गाणे होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.नारायणा...नारायणाचा जयघोषव्यंकटरमना देवा..., या गीताच्या सादरीकरणाप्रसंगी अखेरीस गायकाने धरलेला ताल आणि या भक्तिपूर्ण रचनेच्या शेवटी ‘नारायणा..., नारायणा...,’ चा झालेल्या जयघोषाने मंदिर दुमदुमले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनीही मंत्रमुग्ध होत टाळ्यांनी दाद देत नारायणा...नारायणाचा जयघोष केला. ही रचना कवी पाठक यांनी अवघ्या एका रात्रीत खास ‘शब्द-सूर संवाद’ या कार्यक्रमासाठी रचली होती.

टॅग्स :Nashikनाशिक