शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅटच्या मोजणीने झाली मतदानाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:04 IST

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. २३) ईव्हीएममधील मोजणीदेखील वेळेत पूर्ण झाली व त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी सुमारे तीन तास चालली. अशी एकूण २१ तास चाललेली प्रक्रिया निवडणूक यंत्रणेने अहोरात्र परिश्रम घेऊन पूर्ण केली. व्हीव्हीपॅटमध्ये फक्त उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या चिठ्यांचा समावेश असल्यामुळे त्यांची मोजणी अगदीच सुटसुटीत झाली. या मोजणी प्रक्रियेची ध्वनीचित्रफित काढण्यात आली असून उपस्थित असलेल्या उमेदवार व प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षकांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मोजणीस्थळी भेट देऊन कायदेशीर बाबींच्या पालनाची खात्री केली. विशेष म्हणजे ज्या मतदान केंद्रातील ईव्हीएमशी जोडलेल्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली, त्यातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यातील मते सारखीच निघााली. त्यामुळे मतदारांनी दिलेले मत त्यांच्या पंसतीच्या उमेदवाराला मिळाल्याची खात्री सर्व संबंधीतांना पटली व निरीक्षकांनीही त्याबाबत समाधान व्यक्त केले.लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत व्हीव्हीपॅटची मोजणी म्हणजे औपचारीकता ठरल्याची वार्ता प्रसिध्द झाली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या विहीत कार्यपध्दतीनेच आणि वैधानिकरीत्याच ही प्रक्रिया पार पडल्याचे आढळूून आले आहे.लोकसभा निवडणुकीत आयोगाने ईव्हीएमसोबत यंदा पहिल्यांदाच वापर केलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रातील मतमोजणीमुळे आपले मत नेमके कोणाला गेले, याबाबत घेतल्या जात असलेल्या संशयाला पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे ही सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्यामुळे उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींसोबतच निवडणूक निरीक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकVVPATव्हीव्हीपीएटी