शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:46 IST

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

ठळक मुद्देआज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहेमाणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासनातर्फे ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कविता साळुंके आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख प्रवीण घोडेस्वार होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या परिसंवादात बोलताना कुलगुरू म्हणाले, आज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. ती स्वत:चे घर सांभाळून आपले कर्तव्य पार पाडत असते. तिने अनेक सकारात्मक बदल आपल्या जीवनात स्वीकारले आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ तिची कमाई किंवा तिचा आधुनिक पोशाख, जीवनशैली नाही, तर तो बदल प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातून झाला पाहिजे, असे कुलगुरू म्हणाले. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा असते. पुरुषांनीही स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणला तर ते शक्य होईल, असा सूर या परिसंवादातून उमटला. प्रारंभी सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रवीण घोडेस्वार यांनी प्रास्ताविक केले. संगीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवादात विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया सिंधूबाई जाधव म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून मी या विद्यापीठात काम करतेय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी धुणीभांडी, पोळीभाजीचे काम करून दिवस काढले. मात्र, पतीच्या अकाली निधनानंतर विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाºयांनी सहानुभूती दाखवून मोलाची मदत केल्याने कुटुंबाला मोठी मदत झाली. कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी गेल्या काही महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना पगारवाढीबरोबरच कपडे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात वावरतंय, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. आमच्यासाठी रोजचाच दिवस महिला दिनासारखा असल्याचेही त्या म्हणाल्या.