शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST

बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सटाणा येथील एकूण १८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १४ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. तर नामपूरच्या १८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी ३४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सटाणा येथील एकूण १८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १४ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. तर नामपूरच्या १८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी ३४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.  शेतकऱ्यांमधून बाजार समिती पदाधिकायांच्या निवडीचा कायदा झाल्यानंतर राज्यात प्रथमच बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवारी मतदान होत असून, सटाणा बाजार समिती कार्यक्षेत्रात या निवडणुकीसाठी एकूण ५७ मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. तर नामपूर बाजार समिती कार्यक्षेत्रात एकूण ६९ मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी ठेवण्यात आले असून, त्यामध्ये केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५७ मतदान केंद्रांवर एकूण २८५ कर्मचारी व नामपूरच्या ६९ मतदान केंद्रांवर एकूण ३४५ कर्मचारी ठेवण्यात आले असून दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एक भरारी पथक व एक कॅमेरामन ठेवण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, उमेदवारास मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांचे नाव मतदान यादीत आहे असा एक मतदान प्रतिनिधी व एक बदली प्रतिनिधी नेमता येईल.या गणात आहेत चुरस ...दोन्ही बाजार समित्यांचे सभापतिपद खुले असल्यामुळे सटाणा बाजार समितीच्या सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये चौगाव गणात जिल्हा मजूर संघाचे संचालक शिवाजी रौंदळ, सुनील निकम, केशव मांडवडे, मुंजवाड गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, कंधाणे गणातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, राकेश मोरे, तळवाडे दिगर गणातून पंकज ठाकरे, अजमिर सौंदाणे गणातील विजय पवार, सटाणा गणातील मंगला सोनवणे, माधवराव सोनवणे, पांडुरंग सोनवणे, डांगसौंदाणे गणातील संजय सोनवणे तर नामपूर मध्ये बिजोरसे गणातील भाऊसाहेब अहिरे, नामपूरमधील अविनाश सावंत, द्याने गणात कारभारी पगार, आसखेडा येथे राजेंद्र सावळा, लक्ष्मण पवार, जायखेडा येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, करंजाड गणातील कृष्णा धर्मा भामरे, हे सभापतिपदाचे दावेदार असल्यामुळे या गणात चुरस आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक