शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:56 IST

विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देकर्मचारी केंद्रावर रवाना : चोख पोलीस बंदोबस्त

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : सातपूर येथील प्रभाग क्रमांक २६ व नाशिकरोडच्या प्रभाग २२ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ९ ) रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी मतदान कर्मचारी मतदान यंत्रांसह पोलीस बंदोबस्तात आपापल्या बुथवर रवाना झाले आहेत. दुपारनंतर सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात होत्या.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने मधुकर जाधव तर मनसेचे दिलीप दातीर,भाजपाचे उमेदवार कैलास आहिरे,माकपाचे मोहन जाधव यांच्यासह अपक्ष एकनाथ सावळे,सुवर्णा कोठावदे, अशोक पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात येत आहे. त्यासाठी ४२ बुथची व्यवस्था करण्यात आली असून, बुधवारी सकाळी मतदान कर्मचारी मतदान यंत्रांसह पोलीस बंदोबस्तात बुथवर रवाना करण्यात आले. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी ७ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग २६ ची मतमोजणीची व्यवस्था महापालिकेच्या सातपूर येथील क्लब हाऊस येथे करण्यात आली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद अंतुर्लीकर सहायक म्हणून विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड काम पहात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका