शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

 

नाशिक : महापालिकेच्या सातपूर व नाशिकरोड येथील दोन प्रभागातील रिक्त जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी दिवसभर वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारराजाला आळवणी केली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे सातपूरच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये दिनकर पाटील यांना, तर हेमंत गोडसे यांना नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक ६१ मधून राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रभाग १७ मध्ये दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली, तर सदाशिव माळी हे कॉँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. नाशिकरोडच्या प्रभाग ६१ मध्ये शिवसेनेने केशव पोरजे यांना, तर आघाडीने रवींद्र पोरजे यांना उमेदवारी दिली आहे. पोपटराव हगवणे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान घेण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी सर्व तयारी करण्यात आली. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक व साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी दोन्ही प्रभागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मतदानाला काही कालावधी बाकी असल्याचे पाहून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला. (प्रतिनिधी)