देसराणे : कळवण तालुक्यातील देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच दगाजी रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालय व लोकनेते एन. डी. हिरे इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गावात मतदार जनजागृती अभियान प्रभातफेरी काढण्यात आली.लोकसभा निवडणूकीचे वारे सध्या वाहत असून मतदान प्रक्रि या अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या निवडणुक प्रक्रि येत सहभागी व्हावे, यासाठी शहरातील शाळा, विद्यार्थी जनजागृती करत असून मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देत आहेत.घटनेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे. या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील देसराणे येथे शालेय विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली.‘मतदान करा’ अशा घोषणा देत हातात मतदान जनजागृतीचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी गावातील महत्वाच्या मार्गावरुन ही फेरी काढण्यात आली.याप्रसंगी कळवण येथील पंचायत समितीचे सैय्यद शेख, ग्रामसेवक एन. व्ही. रामोळे, डॉ. मालिनी हिरे, प्रतिमा सोनजे, सायली सोनजे, तेजस्वीनी मालपुरे, मनोहर भान्सी, बी. ए. सावंत, आर. एस. सोनवणे, आर. डि. देवरे, जी. आर. सोनवणे, एम. के. हिरे, यु. आर. वाघ, डि, व्ही. बोरसे, डि. जी. मोरे, एस,आर. भोये. बी. के. बागुल, जी, एस, साठे, श्रीमती आर. डी. जगताप, विद्यार्थी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
देसराणे येथे विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:33 IST
देसराणे : कळवण तालुक्यातील देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच दगाजी रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालय व लोकनेते एन. डी. हिरे इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गावात मतदार जनजागृती अभियान प्रभातफेरी काढण्यात आली.
देसराणे येथे विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती अभियान
ठळक मुद्दे मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देत आहेत.