शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

मतदार याद्यांमध्ये  २६ हजार दुबार, मयत नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:19 IST

अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

नाशिक : अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्णातील मतदार याद्यांची पडताळणीमध्ये सुमारे २६ हजार नावे दुबार आणि मयत आढळली असून, सदर नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक-२०१९ मधील अनुभवानंतर निवडणूक शाखेकडून काळजी घेतली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्यी पडताळणीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या कामाबरोबरच मतदार यादी शुद्धीकरण व नोंदणी, मतदान केंद्रांचा आढावा, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबाबत कामे येत्या काही दिवसांत केली जाणार आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी-देखील कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीत सुमारे २६,३०१ इतकी नावे ही मयत आणि दुबार आढळून आली असून, आणखी जवळपास २५ हजार नावे अतिरिक्त निघण्याची शक्यता आहे. मतदारांकडून मतदार यादीतील नावांसंदर्भात अपेक्षित आणि वेळोवेळी काळजी घेतली जात नसल्यामुळे दुबार आणि मयत मतदारांची नावे यादीत कायम राहतात. यंदा ही संख्या मोठी असल्याचे सुरू असलेल्या पडताळणीत आढळून आले आहे.यामध्ये सिन्नरमध्ये सर्वाधिक नावे आढळून आले असून, चांदवड, मालेगाव आणि दिंडोरीत काही हजारांमध्ये दुबार आणि मयतांची नावे आढळून आली आहेत. सिन्नर मतदारसंघात तब्बल ५७३०, मालेगाव मध्य आणि बाह्ण या दोन्ही मिळून सुमारे पाच हजार नावे सापडली. चांदवडमध्ये ३९४२, येवलामध्ये २०५२, दिंडोरीत ३८०७, कळवणला ११२१ अशी नावे पडताळणीत आढळून आलीआहेत.याद्यांची पडताळणीमतदार याद्यांच्या पडताळणीत नांदगावमध्ये १९२७, मालेगाव (मध्य) २९५८, मालेगाव (बाह्य) २०८१, बागलाण ४३४, कळवण ११२१, चांदवड ३९४२, येवला २०५२, सिन्नर ५७३०, निफाड १००, दिंडोरी ३८०७, नाशिक पूर्व ३३७, नाशिक मध्य ४६३, नाशिक पश्चिम ४१४, देवळाली ११७, तर इगतपुरी या मतदारसंघात ८१८ इतकी नावे दुबार तसेच मयत मतदारांची आढळून आली आहेत.१ जुलैपासून मतदार जागृतीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या पूर्वतयारीनुसार शुक्रवारी जिल्ह्णातील सर्व निवडणूक नायब तहसीलदार यांची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार येत्या १ जुलैपासून मतदार जागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Votingमतदानnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय