नाशिक : हनुमानवाडी अशोकस्तंभ परिसरातील गोळे कॉलनीतील मर्चंटस बँकेसमोरील पाण्याचा व्हॉल्व्ह लिकेज असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे येथील क्लासेसच्या विद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सदर पाण्याचा व्हॉल्व्ह लिकेज असल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला कळविले आहे. मात्र अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)
गोळे कॉलनीत व्हॉल्व्ह लिकेजने पाणी गळती
By admin | Updated: December 25, 2014 01:25 IST