.लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाणी मागावे नभाला, असा कसा जीव वेडा, आला दिस गेला दिस उन्हाळा... या आणि अशा विविध वैशाख वणवा आणि त्याचा दाह शमविणाऱ्या एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण ‘वैशाख वणवा’ या संगीत मैफलीत सादर करण्यात आले. रविवारी (दि. १४) कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.गीतकार संजय गिते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मैफलीची सुरुवात कांचन गोसावी यांनी गायलेल्या ‘वैशाख पुनवेचा’ या गीताने झाली. या संगीत मैफलीत संजय गिते यांच्यासह त्यांचे विद्यार्थी आणि कांचन गोसावी यांनी विविध गीते सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या तसेच कविता, गाणी, गप्पा असे स्वरूप असलेल्या या मैफलीचे निवेदन अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले तर अनिल गिते आणि विनय पठारे यांनी साथसंगत केली. यावेळी मिलिंद गांधी, विजय निपाणीकर, गिरीश टकले, विनायक रानडे तसेच मालेगाव जवळील टेहरे या गावातील राजेश शेवाळे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.
विठ्ठला रे, रूप घे तू पावसाचे..
By admin | Updated: May 15, 2017 01:19 IST