शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे सोमवारपासून नामसप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:12 IST

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

ठळक मुद्देसप्ताहात दि. ५ ते १२ आॅगस्ट या कालावधीत रोज सकाळी ९.३० वाजता संत चरित्र आख्यान

नाशिक : कापडबाजारातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमवारपासून (दि.५) नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहात दि. ५ ते १२ आॅगस्ट या कालावधीत रोज सकाळी ९.३० वाजता संत चरित्र आख्यान होणार असून, नामंवत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. तसेच ज्योतिषाचार्य विद्या बागुल यांचा राशींवर गमती-जमती हा कार्यक्रम, जीवनविद्या मिशनच सुषमा चव्हाण यांचे ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर व्याख्यान, गृहिणींसाठी कार्यशाळा, महिला मंडळाच्या वतीने भजन स्पर्धा, नंदकुमार देशपांडे संचलित सत्यम म्युझिक अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांची भजन संध्या आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, रोज सायंकाळी नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे. दि. १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.इन्फोमहिला भजन स्पर्धानामसप्ताहानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला भजन स्पर्धेचे आयोजन दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक भजनी मंडळाला दोन अभंग सादर करावे लागणार असून, आजवर शहरातील नामवंत भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक