शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या सभेत शिरला आगंतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:27 IST

पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.

नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.बुधवार, दि. २१ रोजी जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास एक मद्यपी सभागृहात अवतरला आणि त्याने सदस्यांच्या मागच्या बाकाचा ताबा घेतला. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाºयाला त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात प्रवेश मिळविला. मात्र तोंडात गुटखा आणि मद्यप्राशन केलेला हा आगंतुक कोणी पत्रकार नसल्याची बाब चौकशीअंती लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या आगंतुकाचा आवेश पाहून कर्मचाºयांनी दोन हात दूर राहूनच त्याला सभागृहाबाहेर जाण्याचा इशारा केला, मात्र तोच येथील कर्मचाºयांना गप्प राहण्यास सांगत होता. ही बाब सदस्यांच्या लवकर लक्षात आली नाही. सदर बाब कर्मचाºयांनी अध्यक्षांचे स्वीय सहायक खैरनार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सदर बाब थेट व्यासपीठावरील मुख्य कार्यकारी अधिकारी गिते आणि अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी पत्रकारांव्यतिरिक्त सभागृहात बाहेरील व्यक्तींनी बसू नये, अशी सूचना केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे अंगरक्षक आणि कर्मचाºयांनी सदर मद्यपीस सभागृहाबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतरही या पठ्ठ्याने दरवाजा ठोकून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला.  बाहेरील कर्मचाºयांशीही त्याने हुज्जत घातली. या दरम्यान, सभेचे कामकाज आटोपत असतानाच त्या मद्यपीने पुन्हा सभागृहात प्रवेश केला आणि सर्व पदाधिकारी, अधिकारी निघण्याच्या तयारीत असताना त्याने माईकचा ताबा घेत, अध्यक्ष महोदय असे म्हणत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील माईक हिसकावून घेत त्याला पुन्हा सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. बाहेर आल्यानंतर त्यांने अनेक सदस्य आणि अधिकाºयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त कर्मचाºयांनी त्यास विचारणा केली असता त्याने आपण एका आमदाराचा भाऊ असल्याचे सांगितले, तर अन्य एका कर्मचाºयाला त्याने आपण पोलीस खात्यात असल्याचे सांगितले तर काहींना आपण पत्रकार असल्याची बतावणी केली. अखेर सभा संपल्यानंतर येथील कर्मचाºयांनी त्या मद्यपी माथेफिरूस जिल्हा परिषदेबाहेर घालवून दिले. तरीही तो तोतया बराच वेळ आवारात घुटमळतच होता.सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरसभागृहात मद्यपी शिरण्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा यंत्रणेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याची प्रचिती सभेदरम्यान आली आहेच. विशेषत: सभा असल्यानंतर प्रवेशद्वारावर शिपायाची फौज असते. त्यातही त्यांना सभागृहातील सर्वच काळजी घ्यावी लागते. वास्तविक सभेच्या काळात तरी निदान प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे अपेक्षित आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर माजी सैनिक असलेले कर्मचारी रखवालदाराचे काम करता तर काही अधिकाºयांच्या बंगल्यांवर सुरक्षारक्षक म्हणूनही कर्मचारी काम करतात. परंतु जिल्हा परिषदेचा विशेष असा सुरक्षा विभाग नसल्यामुळे शिपायांनाच हे काम करावे लागते. आगामी काळात याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद