शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:46 PM

येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

एकलहरे : येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री दोन पाळीव कुुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.  एकलहरे-हिंगणवेढे शिव रस्त्यालगत मळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करून राहतात. आजूबाजूला उसाचे भरपूर क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. या परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याची मादी व तीन बछडे यांचा संचार असून, त्यांनी आतापर्यंत अनेक कुत्रे, बकरे, वासरे फस्त केले आहेत. साहेबराव निवृत्ती धात्रक यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर मंगळवारी रात्री ९ वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला करून ओढून नेले. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे नागरिकांनी बँटऱ्यांच्या प्रकाशात बिबट्याच्या दिशेने दगडगोटे भिरकावल्याने जखमी कुत्र्याला सोडून बिबट्याने उसामध्ये पलायन केले. या कुत्र्याच्या गळ्यात लोखंडी अनकुचिदार पट्टा असल्याने त्याचा जीव वाचला असला तरी, त्याच्या अंगावर व गळ्याभोवती अनेक ठिकाणी बिबट्याच्या दातांच्या जखमा झाल्या आहेत.या बिबट्याने आतापर्यंत रामकिसन गणपत मोरे यांची शेळी, अशोक तुकाराम धात्रक यांची गाय, यमाजी नामदेव नागरे, भारत पुंजा पवळे, संतोष सुरेश धात्रक (उपसरपंच) यांचे कुत्रे, जयराम पंढरीनाथ राजोळे व शरद कारभारी राजोळे यांचे कुत्रे व वासरू फस्त केले आहे.  सध्या सर्वत्र ऊसतोड झाली आहे. क्वचित एक-दोन ठिकाणी शेतात ऊस उभा आहे. या ठिकाणीच बिबट्या मादी व तिच्या तीन पिलांचा मुक्काम आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गेल्या एक ते दीड वर्षापासून या परिसरात बिबट्याची मादी व तिची तीन पिले वास्तव्य करून आहेत. दिवसाढवळ्याही त्यांचे अनेकदा दर्शन झाले आहे. या मादी बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली आहेत. ऊसतोड झाल्याने आता लपायला जास्त जागा नाही. मात्र एक-दोन ठिकाणचा ऊस व काटेरी झाडेझुडप्यांमध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा.- संपत निवृत्ती धात्रक, हिंगणवेढे

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक