शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:25 IST

राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत पाच रुपये दराने एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानांनाही भेट : सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनानाशिक शहरातील रेशन दुकान, शिवभोजन केंद्र, किराणा दुकान पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून, राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत पाच रुपये दराने एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन रेशन दुकानावर धान्य वितरण करताना तसेच शिवभोजन केंद्रावर सोशल डिस्टन्ंिसग आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना दिल्या.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य व शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र या योजना राबवित असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन होऊन गरीब व गरजू नागरिकांना जेवण व अन्नधान्य मिळते की नाही याबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील रेशन दुकान, शिवभोजन केंद्र, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स आणि महानगरपालिकेच्या अन्नछत्राला भेट देऊन पाहणी केली. नाशिक शहरात गोरगरीब, बेघर, मजूरवर्ग, तसेच बाहेरून आलेल्या मजुरांसाठी शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा केंद्र सुरू केली आहे. या निवारा केंद्रामध्ये एकूण ५७९ लोक दाखल असून, छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ येथील केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक