शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रतापदादा सोनवणे भुजबळांच्या भेटीला

By admin | Updated: September 7, 2014 00:38 IST

प्रतापदादा सोनवणे भुजबळांच्या भेटीला

 

नाशिक : लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी आज भुजबळ फार्म येथे धडकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस समीर भुजबळ यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना सोनवणे यांच्या या भेटीने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.गत लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी प्रताप सोनवणे यांना तिकीट नाकारत भाजपाने डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली. तेव्हापासून सोनवणे नाराज असल्याचे बोलले जात होते. विधानसभेत संधी दिली जाईल, असे त्यांना पक्षाने आश्वासन दिल्याचेही दरम्यानच्या काळात सांगितले जात होते. मात्र नाशकातील पूर्व आणि पश्चिममध्ये पक्षातर्फे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता संधी मिळेलच याची शक्यता नसल्याने प्रतापदादा सोनवणे यांनी आज थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेले भुजबळ फार्म गाठल्याची चर्चा आहे. त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. उभयंतात सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र त्याचा अधिकृत तपशील कळू शकला नाही. विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असतांना सोनवणे-भुजबळ यांच्या भेटीने उलटसुलट चर्चेला जोर आला आहे. त्यातच सद्यस्थितीत सिडको आणि सातपुर या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडे देखील सक्षम उमेदवार नसल्याच्या पार्श्वभुमीवर सोनवणे-भुजबळ यांची झालेली भेट व गोपनीय चर्चा यातून सोनवणे यांच्या आगामी राजकीय भवितव्याची चर्चा रंगु लागली आहे.