सिन्नर: कोनांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू गवारी यांची बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. उपसरपंचपदी विमल डावरे यांची बिनविरोध वर्णी लागली.
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक पार पडली. त्यास मोहन डावरे, संतोष डावरे, परशराम डावरे, संजय गायकवाड, रत्ना पगार, विजाबाई गवारे आदी उपस्थित होते. सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते. मात्र, या प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक अधिनियमानुसार त्याच प्रवर्गातील व्यक्तीस सरपंचपदी निवडण्यात येत असल्याने विष्णू गवारी यांची निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी गवारी यांच्यासह विजाबाई गवारे यांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र, विजाबाई गवारे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे गवारे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
--------------------
कोनांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू गवारी यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी मोहन डावरे, अशोक डावरे, सुदाम डावरे आदींसह समर्थक उपस्थित होते. (२६ कोनांबे)
===Photopath===
260221\26nsk_21_26022021_13.jpg
===Caption===
२६ कोनांबे