शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारण्टाइन केलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:45 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.देवळा तालुक्यालगत असलेल्या चांदवड, सटाणा, कळवण, मालेगाव या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सापडले असले तरी सुदैवाने अद्याप देवळा तालुका कोरोनामुक्त आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर देवळा तालुक्यात पुणे, मुंबई, नाशिक, मालेगाव आदी प्रतिबंधित क्षेत्रांतून अनेक नागरिक आले आहेत.यापैकी काही नागरिक आपल्या मूळ गावी न जाता इतर गावात नातेवाइकांकडे थांबले आहेत. यामुळे काही गावात वादविवाद झाले आहेत. आरोग्य विभागाने या नागरिकांना १४ दिवस होम क्वॉरण्टाइन राहण्याच्या सूचना दिल्या असून, तसे राहणे बंधनकारक आहे. परंतु काही अपवाद सोडले तर इतर महाभाग सूचनांचे पालन न करता गावात फिरताना दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या नागरिकांबाबत कठोर भूमिका घेण्यात स्थानिक प्रशासन कमी पडल्याचे चित्र आहे. गावातील राजकारण, भाऊबंदकी, हितसंबंध जोपासण्यास प्राधान्यक्रम यामुळे कठोर पाऊल उचलली जात नसल्याची चर्चा आहे.

अकरा जणांचे अहवाल प्रलंबित१८ मे रोजी मुंबईस्थित एका महिलेचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिला देवळा तालुक्यातील मेशी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आली होती. या महिलेच्या संपर्कातील अकरा जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. आजच्या घडीला कोरोना तालुक्याच्या उंबरठ्यावर आला आहे. असे असताना बाहेरगावांहून आलेले काही बेजबाबदार नागरिक ग्रामपंचायतीने सूचना देऊनही कुठलीही सुरक्षासाधने न वापरता गावभर फिरताना दिसून येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य