शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबाग तोडून घेतली भाजीपाला शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:53 IST

लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे.

ठळक मुद्देलखमापूर : द्राक्ष पिकाला दर मिळत नसल्याने बळीराजांचा नवीन शेती प्रयोग

लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे.तालुक्यातील छोटेसे खतवड हे द्राक्ष पिकविण्यासाठी एक आदर्श गाव, परंतु दिवसेंदिवस द्राक्ष शेती करणे फार अवघड होत चालले आहे. महागड्या औषधांचा वापर करून द्राक्ष पीक घेतले जाते. जेवढे उत्पन्न त्यातले ३० ते ३५ टक्के भांडवल अगोदर खर्च करावे लागते. नंतर हातात पैसा हे गणित द्राक्षे हंगामाचे राहते. त्यामुळे खूप मेहनत, भरपूर भांडवल, मनुष्य बळ हे सर्व करूनही घेतलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही, म्हणून शेतकरीवर्ग नाराज होत चालला आहे.या संकटांना न घाबरता गोकुळ महाराज खुर्दळ यांनी नवीन प्रयोग करीत एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून, त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचा प्रयोग करून भाजीपाला शेती करीत कमी दराच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आहे.गोकुळ महाराज खुर्दळ हे सध्या देहू येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून, संत सावता महाराज यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी... अवघी विठाई माझी’ या अंभगाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या शेतात द्राक्ष पिकांची झाडे काढून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करीत भाजीपाला शेती करण्यास सुरु वात केली आहे. भाजीपाला शेती चांगली येत असल्याने आणि योग्य दर मिळण्यास चांगली मदत होत आहे.मागील तीन वर्षांपासून आम्हाला द्राक्ष पिकाला खूप मेहनत करूनही योग्य दर मिळत नव्हता. कर्ज मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही शेतीमध्ये बदल करण्याचे ठरविले व द्राक्षबागा तोडून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीची भाजीपाला शेती सुरू केली, आम्हाला त्यामध्ये यश मिळत आहे.- गोकुळ महाराज खुर्दळ (खतवड)