शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कवडदरा,साकूर परिसरातील गावे तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:26 IST

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अ्राहे.

ठळक मुद्देशेतीकामे ठप्प : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अ्राहे.विजेच्या अभावामुळे ह्या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून ग्रामीण भागात वीज मंडळाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणीपुरवठा योजना, बँकिंग, आरोग्य आदींसह सिन्नर घोटी महामार्गावरील व्यवसाय धोक्यात आले आहेत. ह्या प्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा कोणत्याही क्षणी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी दिला आहे.गेल्या तीन दिवसांपासून कवडदरा साकुर परिसरासह एसएमबीटी रुग्णालय ते धामणगावपर्यंतच्या सर्व गावात वीज गायब आहे. वीज कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नेमके काय चालले आहे याबाबत ह्या भागात अनभिज्ञता आहे. एसएमबीटी, कवडदरा, भरविर खुर्द, भरवीर बुद्रूक, धामणगाव, घोटी खुर्द, साकुर, निनावी, शेणीत, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा ही सर्व गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे.अनेक गावांचा पाणीपुरवठा बंदवीजपुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. पाणी उपलब्ध असतांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहे.गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. वीज मंडळाने अधिक अंत न पाहता युद्धपातळीवर काम करून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.-आत्माराम फोकणे, सामाजिक कार्यकर्ते, घोटी खुर्द

टॅग्स :electricityवीजDarknetडार्क नेट