शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

पाण्यासाठी एकवटले अवघे गाव !

By admin | Updated: June 19, 2016 23:06 IST

मजले चिंचोली पॅटर्न : मंदिर जीर्णोद्धाराची रक्कम जलसंधारणासाठी; व्हॉट््सअ‍ॅपवर दिल्या जातात बातम्या

 सुदीप गुजराथी नाशिक‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिंचोली या छोट्याशा गावात सध्या येत आहे. गावाचा पाणीप्रश्न सुटावा, या उद्देशाने अवघे गाव एकवटले असून, लोकवर्गणीतून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. एवढेच नव्हे, गावातील वीरभद्र मंदिराच्या जीर्णोद्धाराची रक्कमही या कामासाठी वापरली जात असून, हा मौजे मजले चिंचोली पॅटर्न राज्यभरात अनुकरणीय ठरत आहे. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील व शनि शिंगणापूरपासून वीस किलोमीटरवर असलेल्या मजले चिंचोली या गावाची ही चित्तरकथा आहे. अवघ्या सोळाशे लोकसंख्येचे हे गाव अनेक आगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. जलसंधारण योजनेसाठी संपूर्ण गाव एकत्र आल्याचे दुर्मीळ चित्र तेथे दिसत आहे. त्याची सुरुवात निवृत्त पोलीस अधिकारी डी. वाय. आव्हाड यांच्या सूचनेतून झाली. राज्यभरात शासनाच्या निधीतून जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असताना, शासनाच्या मदतीची वाट न पाहता ही कामे लोकसहभागातून करण्याची सूचना त्यांनी ग्रामसभेत केली. गावाच्या सरपंच गीतांजली आव्हाड व उपसरपंच धर्मनाथ आव्हाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तेथून या कामासाठी निधी जमवण्याची धडपड सुरू झाली आणि मजले चिंचोली जलजागृती अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गीतांजली आव्हाड या गावाच्या पहिल्या महिला सरपंच असून, त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पती अविनाश आव्हाड यांच्या साथीने कसोशीने प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान गावातील धनगर समाजबांधवांनी मंदिर उभारणीसाठी दोन लाख रुपये जमवले होते, तर वीरभद्र मंदिराच्या दानपेटीत बांधकामासाठी चार लाख ८४ हजार रुपये जमा झाले होते. डॉ. योगेश कर्डिले यांच्या प्रयत्नांतून हे सारे पैसे गावाच्या जलजागृती अभियानासाठी देण्यात आले. देवाच्या कामासाठी जमवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचा पायंडाही यानिमित्ताने पडला. आर्ट आॅफ लिव्हिंगचे विजय हाके, अशोका बिल्डकॉनच्या सहकार्यातून गेल्या १० मे रोजी दोन पोकलेन, जेसीबी, डम्पर व ग्रामस्थांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अभियानाला प्रारंभ झाला. गेल्या महिनाभरात गावातील वाघोडा नाला, गायमुख तलाव, वीरभद्र तलाव व पिंपळदरा तलावात तब्बल ३३ हजार चौरस मीटर खोदकाम करून खोली वाढवण्यात आली.