शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लस घेण्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:49 IST

खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले.

ठळक मुद्दे खामखेडा : लस कमी पडल्याने अनेक जण फिरले माघारी

खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले.गेल्या सहा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याने खामखेडा येथील आरोग्य केंद्रात लसीकरण बंद होते. बुधवारी (दि. ५) देवळा तालुक्याला एक हजार लसी मिळाल्याने यामधील खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रास दोनशे लस तालुका स्तरावरून देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रास लस आल्याचे समजताच लस घेण्यासाठी भऊर, सावकी, विठेवाडी व खामखेडा येथील नागरिकांनी आरोग्य केंद्रावर गर्दी केल्याने आरोग्य केंद्राच्या आवारात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना नागरिक दिसत नव्हते.सुरुवातीला या लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु लसीकरण झालेल्या नागरिकांची कोरोना प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे दिसून आल्याने नागरिकांना कोविड लसीचे महत्त्व लक्षात आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.कोविडच्या मिळालेल्या लसींपैकी ७० टक्के लस ही दुसऱ्या लसीचा डोस घेणाऱ्यांसाठी आणि ३० टक्के लसी पहिल्या डोस घेणाऱ्यांसाठी ठेवण्यात आली होती. परंतु पहिला डोस घेण्यासाठी गुरुवारी (दि. ६) नागरिकांनी गर्दी केली होती. पहिला डोस व दुसरा डोस असे दोन्ही एकत्र असल्याने आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले. मात्र, लस कमी असल्याने अनेकांना लस न घेता परतावे लागले.सध्या कोविड लस घेण्यासाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन ही गर्दी रोखण्यासाठी रजिस्ट्रेशन टेबलाची संख्या वाढवण्यात यावी, पहिला डोस व दुसरा डोस असा स्वतंत्र विभाग करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसgram panchayatग्राम पंचायत