शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे गावगाडा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:11 IST

सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे.

सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातील ग्रामसेकवकांनी २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. आपल्या मिनी मंत्रालयाच्या चाव्या गटविकास अधिकारी यांच्या हवाली करण्यात आल्या. अशातच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच गावातील विकासाची कामे राबविण्याची कामे राबविणारे ग्रामसेवक संपावर गेल्याने विकास कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रकारच्या योजनांसाठी लागणारे कागदपत्र मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील गावगाडा विविध कामांशिवाय ठप्प पडला आहे. ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारले, परंतु त्यांच्या आंदोलनाचा शासनस्तरावर विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघाने २२ आॅगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देवून राज्यव्यापी कामबंद मध्ये सहभाग घेवून कामबंद आंदोलन पुकारले. ग्रामसेवक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांमध्ये नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या ग्रामसेवक यांनी जुनीपेंशन योजना लागू करावी, विस्तार अधिकारी पदे निर्माण करावी, ग्रामसेवक हे पद रद्द करण्यात येवून या पदाला ग्रामविकास अधिकारी दर्जा देण्यात यावा, १५ हजार लोक संख्येपेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करावे, अन्य विभागांच्या कामांची वाढावी, वेतन त्रुटीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कर्तव्य सूची ठरविण्यात यावी आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यावर मंत्र्यांनी आश्वासन दिले, परंतु आंमलबजावणी झाली नाही. सर्वच ग्रामसेवकांना ही जनतेचे आपल्या वाचून कुठलेही काम आडून राहू नये विद्यार्थ्यांनाही शालेय अडचणी येवू नये व गावाचा विकास थांबू नये, परंतु शासन दरबारी गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या मागण्या आम्ही मांडत आहोत. परंतु दखल घेतली जात नसल्याने आम्हाला नाविलाजाने कामबंद आंदोलन करवा लागले आहे.------------------------------विविध कामांसाठी लागणारी अनेक प्रमाणपत्रे ग्रामसेवकांमार्फत दिली जातात. मात्र संप सुरू झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात व नागरिकांना महत्वाचे दाखले देण्यात अडचणी येत आहे. शासनाने ग्रामसेवकांच्या मागणीकडे लक्ष देवून ग्रामीण भागात होणारी जनतेचे हाल थांबवावे व लवकरात-लवकर तोडगा काढवा. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरूळीत होण्यास मदत होईल-गोपाल शेळके, तालुकाध्यक्ष सरपंच सेवा संघटना, सिन्नर.

टॅग्स :Nashikनाशिक