शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’

By admin | Updated: September 8, 2015 23:08 IST

‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’

निफाड : राज्यात दुष्काळाचे सावट आहे, पाऊस न पडल्याने शेतकरी, मजूरवर्ग कोलमडून पडला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी व सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच भारती कापसे यांनी केले आहे.निफाड शहर व परिसरात यंदा समाधानकारक पाऊसच झाला नाही, याचा परिणाम शेतीसह इतर उद्योगव्यवसायांवर झाला आहे. मजूर, व्यापारीवर्गालाही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात पैशांची उधळपट्टी करून गल्लोगल्ली सार्वजनिक गणपती बसवले तर ते योग्य ठरणार नाही. निफाडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बऱ्याचदा सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याने व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनतेत नाराजी असते. आधीच दुष्काळ त्यात महागाई त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. गणेशोत्सव मंडळातर्फे विद्युत रोषणाई, डेकोरेशन, मिरवणुकीसाठी महागडे बॅण्ड, डीजे यासाठी वारेमाप खर्च केला जातो.अशा दुष्काळी परिस्थितीत गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीची वर्गणी वसुली करून गणेशोत्सव साजरा न करता ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, अशी सूचना कापसे यांनी केली आहे. गणेशोत्सव सर्वानुमते, सर्वांच्या सहभाग व सहकार्याने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा, असे यांनी सांगितले.त्यासाठी निफाड शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक व मंडळाचे कार्यकर्ते, प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवावा व निफाड शहराचा आदर्श सर्वांसमोर ठेवावा, असे आवाहन कापसे यांनी केले आहे. (वार्ताहर)सिन्नरला शिवाजी चौकात दहीहंडी उत्साहातसिन्नर : येथे शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी गोंदेश्वर मित्रमंडळ, नागेश्वर मित्रमंडळ, बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी हजेरी लावली. पाच थर लावून बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. त्यांना आयोजकांच्या वतीने रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक संजय नवसे, गौरव कर्पे, योगेश शेजवळ, विकी जाधव, आशिष नवसे, भय्या पेखळे, बापू वैद्य, तुषार क्षत्रिय, अजित गिते, संकल्प जाखडी, संदीप भालेराव आदिंसह तरुण उपस्थित होते. घनश्याम देशमुख, मनीष गुजराथी, हेमंत देवनपल्ली यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)