शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकारी बदलीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:22 IST

इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देघोटी शहरात बंद : ग्रामस्थांतर्फे इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषण; विकासाला खीळ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे ग्रामपालिका पदाधिकारी आक्र मक झाले असून, प्रशासनाने घोटी ग्रामविकास अधिकारी यांची बदली रद्द करावी अन्यथा ११ जूनपासून इगतपुरी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलीच्या निषेधार्थ घोटी शहर बंद ठेवण्यात आले.घोटी ग्रामपालिकेने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून घोटी ग्रामपालिकेत ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगले काम करणाºया उत्तम शेटे, ए. एस. चौधरी यांच्या बदल्या झाल्या. पाच महिन्यांपूर्वी के. बी. दळवे यांच्याकडे घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार देण्यात आला. त्यांनी उत्तम सेवा दिली. तसेच घोटी शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी विविध कामांचे नियोजन केले असून, शहराच्या मूलभूत सुविधा व सेवा देण्यात ते मोलाची भूमिका बजावत आहेत, असे असताना प्रशासनाने त्यांची बदली केल्याने घोटी शहरात विकासकामांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करण्याची मागणी प्रभारी सरपंच संजय आरोटे यांच्यासह सदस्य रामदास भोर, सचिन गोणके, रवींद्र तारडे, गणेश गोडे आदींनी केली आहे.

वर्षभरात घोटी ग्रामपालिकेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ए. एस. चौधरी यांची नेमणूक झाली. तेही चांगले काम करीत असताना सहा महिन्यांत त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच के. बी. दळवे यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्याकडूनही घोटीचा कार्यभार काढून घेऊन रवींद्र धुंदाळे यांच्याकडे देण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ग्रामविकास अधिकारी दळवे यांची बदली रद्द करावी, घोटीचा कार्यभार व मुख्यालय त्यांच्याकडेच द्यावे या मागणीसाठी शहर बंद ठेवून बेमुदत उपोषण करणार आहोत.- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी

घोटी ग्रामपालिकेत वरिष्ठ प्रशासनाकडून वर्षभरात तीन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे घोटी शहराच्या विकासाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विद्यमान ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांच्याकडून चांगले काम व घोटी शहराच्या विकासात हातभार लागत असतानाच त्यांच्याकडून अल्प कालावधीत कार्यभार काढून घेतला आहे. ग्रामविकास अधिकारी दळवे यांच्याकडेच घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार कायम करण्यात यावा.- रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य, घोटी

टॅग्स :Governmentसरकार