शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

कळवणला गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: August 4, 2016 00:49 IST

नद्यांना पूर, पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते खचले, तालुक्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

कळवण : तालुक्यातील धरण लाभक्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी- नाल्यावरील पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते वाहून गेल्याने साकोरे भागातील तसेच भौती, उंबरदे, ततानी, शेपूपाडा, जिरवाडे, शृंगारवाडी, वीरशेत, मांगलीदर आदि भागातील आदिवासी जनतेचा आणि गावांचा संपर्कतुटला आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असून, गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डे दिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंड पिंप्री, धनोली, भेगू, जामले वणी, ओतूर आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने कळवण, तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नद्यांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने या नद्यांवरील सर्व पूल वाहून गेले आहेत, भराव वाहून गेले तर काही ठिकाणी रस्तेच गायब झाल्याने पायी वाटचाल करणेदेखील जनतेला अवघड होऊन बसले आहे.साकोरे येथील बंधारा वाहून गेल्याने या बंधाऱ्यालगत असलेल्या साकोरे येथील ५० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतमाल घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साकोरे येथील वाहून गेलेल्या बंधाऱ्याची व रस्त्याची चौकशी केली नसल्याने साकोरे येथील शेतकरी गोरख देवरे यांनी नाराजी व्यक्त करीत गावाशी संपर्क साधण्यासाठी रस्ता दुरूस्त करून देण्याची मागणी केली आहे.कळवण तालुक्यातील आदिवासी व दुर्गम अतिदुर्गम भागातील रस्ते उखडून गेले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला असून, डोंगर उतावरील पाण्याबरोबर मातीदेखील वाहून येत असल्याने रस्ते चिखलमय झाले असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डोंगर उतारावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून, संपर्क तुटला आहे. गावागावांच्या नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे व नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यावरील फरश्यादेखील वाहून गेल्या आहेत.आदिवासी भागातील भौती- उंबरदे रस्त्यावरील पुनंद नदीवरील पूल तुटल्याने आदिवासी गावांचा व पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तांबड्या नदीच्या पुलावरील भराव वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, तताणी- शेपूपाडा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूचे भरावदेखील वाहून गेल्याने या भागातील दहा ते बारा गाव, खेड्यापाड्यातील आदिवासी जनतेचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे, तर शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना रस्ते बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयातील शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)