शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये  ग्राम बालविकास केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:21 IST

पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत.

नाशिक : पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारपासून अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत ग्राम बालविकास केंद्रांचे उद््घाटन करण्यात आले.ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात येणारे प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांच्या हस्ते ग्राम बालविकास केंद्राचे उद््घाटन झाले. त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील जातेगाव, मातोरी, दुगाव, सावरगाव, धोंडेगाव, गोवर्धन, नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु।। आदी ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत बालकांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी मागील वर्षी जिल्ह्यात तीन स्तरावर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.यावर्षीही आरोग्य विभागाच्या वतीने बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येऊन ० ते ६ वयोगटांतील बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे.वेळापत्रकानुसार देणार आहारग्राम बालविकास केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार असून, केंद्रात शासनाकडून आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आहार व औषध देण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक