शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विल्होळीला कुस्त्यांची दंगल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:52 IST

विल्होळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन विल्होळी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले.

विल्होळी : विल्होळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन विल्होळी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले. यात मानाची कुस्ती बरोबरीत झाल्याने दोन्ही कुस्तीपटूंना समान बक्षिसाचे वाटप करण्यात आले, तर महिलांच्या कुस्त्यांमध्ये मुलींनी बाजी मारली.या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सार्थक नेहेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष वाळू नवले, संजय चव्हाण, बबन गायकवाड, भास्कर थोरात, पुंजा निंबेकर, बाबुराव रुपवते, नामदेव भावनाथ, बंडू चव्हाण, पुंडलिक सहाणे, निवृत्ती देशमुख, भिकाजी मते आदी उपस्थित होते.महिलांच्या कुस्त्या बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. यामध्ये भगूर येथील कुमारी प्रतीक्षा भालेराव, गायत्री झांजरे तर साकूर फाटा येथील मानसी बिरछे या मुलींनी कुस्ती करत पारितोषिक व रोख रक्कम मिळवली. पंच म्हणून संजय गायकवाड, मोहन भवनाथ, कैलास भावनाथ, वाळू नवले यांनी काम पाहिले.कुस्त्यांना सुरुवात होऊन प्रथमत: बालगोपाळांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. मानाची कुस्ती स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मरणानार्थ चांदीची गदा व रोख रकमेची कुस्ती पिंपळदचे पहिलवान संदीप बोडके व पिंपळगाव बहुला येथील श्रीनाथ सानप यांच्यात होऊन अखेरीस कुस्ती चितपट न झाल्याने पंचांच्या निर्णयानुसार दोन्ही पहिलवानांना समान बक्षीस वाटप करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक