शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:46 IST

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले

विल्होळी : रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले असून, अर्धवट झालेल्या या कामांमुळे रस्त्यावरील धूळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्न- पाण्यात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यात टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विल्होळी व बेलगाव ढगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.विल्होळी-बेळगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक काम बंद पडले असून, रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच पडून आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदार दाद देत नसल्याने त्याचा खुलासा होऊ शकला नाही, तथापि चौकशीअंती बाजारात खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.खडी मिळत नसल्याने काम बंदरस्त्याच्या कामासाठी साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले. त्याचबरोबर निवडणूक व लग्नसराईमुळेदेखील कामगार गावाकडे निघून गेल्याने काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मात्र रस्त्याच्या कडेला राहणाºया शेतकरी, कंपन्यांच्या गुदाममधील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.पावसाळ्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे. एक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. ठेकेदारास फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन काम त्वरित चालू करावे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून चिखल तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण व्हावे.- दत्तात्रय ढगे, सरपंच, बेळगाव ढगादहा ते पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. खडी उपलब्ध नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगार लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काम बंद आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम चालू होईल, परंतु डांबरीकरण पावसाळ्यानंतर होईल.- यश खैरनार, ठेकेदार

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा