शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबिरीने गाठला विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:34 IST

गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबीरच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (दि.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवारी (दि. २२) आजवरच्या दरांमध्ये सर्वांत उच्चांकी म्हणजे २७ हजार ५११ रुपये शेकडा जुडी असा भाव मिळाला आहे. सलग चार दिवसांपासून कोथिंबीरचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.

संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबीरच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (दि.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवारी (दि. २२) आजवरच्या दरांमध्ये सर्वांत उच्चांकी म्हणजे २७ हजार ५११ रुपये शेकडा जुडी असा भाव मिळाला आहे. सलग चार दिवसांपासून कोथिंबीरचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.  परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक नष्ट झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोथिंबीरच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत आवक घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. गुरुवारी (दि.१९) कोथिंबिरीची १८ हजार रु पये शेकडा दराने विक्री झाली होती, तर शुक्र वारी दर तेजीतच असल्याने १९ हजार रुपये शेकडा दर मिळाला होता. शनिवारी (दि.२१) कोथिंबीर बाजारभावाने चालू वर्षाचा उच्चांक मोडला. शनिवारच्या दिवशी कोथिंबीर तब्बल २० हजार रुपये शेकडा म्हणजेच २०० रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली. इतरवेळी साठ ते सत्तर हजार कोथिंबीर जुडीची आवक व्हायची तेथे आता सात ते आठ हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजार समितीत दिंडोरी, कळवण तसेच सिन्नर तालुका व जवळपासच्या आदिवासी भागातून आवक होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पाडळी येथील शेतकरी दुर्गेश रेवगडे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत आणलेली कोथिंबीर छोटू चव्हाण या व्यापाºयाने २० हजार रुपये शेकडा दराने खरेदी केली. गेल्या महिनाभरापासून कोथिंबीरचे बाजारभाव तेजीतच असल्याने तसेच ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना कोथिंबीरच्या चार काड्या खरेदीसाठी कमीत कमी दहा रुपये मोजावे लागत आहेत.