शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

महिला वनरक्षकाची सतर्कता; पालापाचोळ्याखाली दडवून होणाऱ्या खैराच्या तस्करीचा डाव उधळला

By अझहर शेख | Updated: May 15, 2024 18:13 IST

वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे.

नाशिक : गुजरात सीमावर्ती भागातील पेठ वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैरासारख्या मौल्यवान प्रजातीची तोड करून लाकडाची तस्करी करणारा कुख्यात तस्कर विष्णू राऊत याने पुन्हा वनविकास महामंडळाच्या गस्ती पथकाला चकवा दिला; मात्र महिला वनरक्षकाच्या सतर्कतेमुळे आपट्याच्या पाळापाचोळ्याखाली दडवून पीकअप जीपमधून तोडलेल्या खैराची लाकडांच्या तस्करीचा डाव उधळून लावण्यास वन गस्ती पथकाला मंगळवारी (दि.१४) यश आले.

वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे. पेठ तालुक्यातील महामंडळाच्या राखीव जंगलात मंगळवारी फिरते दक्षता पथक पेठ, आंबा, झरी भागात गस्तीवर होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फिरते वनपथक, एफडीसीएम झरी वनपथकांसह वनरक्षकांची दुचाकीवरून गस्त सुरू होती. यावेळी एक पीकअप जीप (एम.एच०४ सीपी १९६८) आपट्याच्या पाळापाचोळा घेऊन जाताना महिला वनरक्षक अनुराधा श्रीरामे यांना नजरेस पडली. त्यांनी ती अडविली असता चालकाने आपट्याची पाने घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी श्रीरामे यांनी पाळापाचोळा उचकण्यासाठी पाठीमागे गेल्या तेव्हा संधी साधत चालकाने तेथून धूम ठोकली. पाळापाचोळ्याखाली तोडलेल्या खैराच्या झाडाचा बुंधा व मोठ्या फांद्यांचे सात नग आढळून आले. श्रीरामे यांनी त्वरित फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैय्या यांना ‘कॉल’ दिला. झरी वनपरिक्षेत्र अधिकारी बापू शेवाळे, वनपाल चेतन चौरे, माधुरी साळुंखे, कुंदन राठाेड, तारामती खिराडी, वाहनचालक डी.पी बोंबले आदींच्या पथकांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. दोन्ही पथकांनी या भागातील रस्त्यांवर वेगवेगळ्या दिशेने गस्त करून शोध घेतला मात्र संशयित आरोपी विष्णू बन्सी राऊत (२९, रा.खिर्डी, ता.सुरगाणा) हा त्याच्या साथीदारासह पळून गेला. त्याच्याविरूद्ध तस्करीचे तीन वनगुन्हे दाखल असून वनविभागाच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांपैकी एक आहे. प्रादेशिक वनविभागालाही तो तस्करीच्या गुन्ह्यात हवा आहे. विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजीत नेवसे, सहायक व्यवस्थापक धीरज परदेशी यांनी दिलेल्या सुचनांनूसार सीमावर्ती भागात तीन पथकांना अलर्ट देण्यात आला आहे. बलैया शेवाळे यांची पथके त्याच्या मागावर असल्याचे सुत्रांनी सांगितले.२ लाखांचा मुद्देमाल जप्तवनगुन्ह्याच्या या कारवाईत तोडलेल्या खैराचे सात नग मिळून एकुण ०.१६९घनमीटर लाकूड आणी जीप असा सुमारे २ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खैराची तस्करी लक्षात येऊ नये, यासाठी आपट्याच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांखाली लाकडे दडवून नेली जात होती. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग