शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दक्षतेचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:06 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन उपाययोजनेबाबत सूचना केल्या जात आहेत़ दरम्यान काही ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे़

ठळक मुद्देनगरसूलमध्ये औषध फवारणी : निफाडला शासकीय अधिकाऱ्यांची बैठक

नाशिक : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन उपाययोजनेबाबत सूचना केल्या जात आहेत़ दरम्यान काही ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे़निफाड तहसील कार्यालयनिफाड : कोरोना विषाणूसंदर्भात निफाड तालुक्यात केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीला तहसीलदार दीपक पाटील, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पठारे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक हर्षवर्धन मोहिते, निफाड,ओझर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सायखेडा, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे लासलगाव पिंपळगाव बाजार समितीचे सचिव, लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बस आगाराचे प्रतिनिधी, तसेच राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी कोरोना विषाणूबाबत केलेल्या आदेशाचे वाचन करण्यात आले. या आदेशाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच तालुक्यात सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉ. पठारे व दीपक पाटील यांनी केले.नगरसूल ग्रामपंचायतनगरसूल : येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच प्रसाद पाटील यांनी केले आहे. तसेच गावात औषध फवारणी केली आहे.सिन्नर नगर परिषदसिन्नर : देश व राज्यात कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेने कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. संशयित रुग्ण आढळून आल्यास कक्षासोबत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उपमुख्याधिकारी रोहित पगार यांची नोडल आॅफिसर म्हणून तर नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांची मेडिकल आॅफिसर म्हणून यात नियुक्ती आहे. या कक्षात नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन े करण्यात आले आहे.दवंडीद्वारे जनजागृतीमालेगाव मध्य : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. ठिकठिकाणी दवंडीद्वारे नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बापू गांधी कापड बाजारासह गर्दीच्या ठिकाणी बंद पाळण्याचे आवाहन महापालिकेने दवंडीद्वारे केले. नागरिकांमध्येही कोरोनाविषयी जनजागृती होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य