लासलगाव : विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगावच येथे प्रवचनात केले.बालाजी मंदिराच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. मालेगावचे पंडित कैलास महाराज दायमा यांच्या पौरोहित्याखाली गरुड ध्वजारोहण, श्रीराम धून, श्री हनुमानसचालिसा पाठ कार्यक्रम घेण्यात आले. गुरुमहिमा या विषयावर शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा व गोविंद बालसंस्कार अंतर्गत गुरुआशिष कार्यक्रम संपन्न झाले. नवकलश अभिषेक करण्यात आला. यानिमित्त शोभायात्रा लक्ष्मी मंदिरपासून येथील भगवान बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आली.शोभायात्रेत रत्नजडीत चित्ररथावर स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज विराजमान झाले होते, तर भगवान बालाजी तसेच गौरी महेश वर्मा यांनी साकारलेली सरस्वती देवी व कुमार वाघ याने साकारलेले श्री गणेश चित्ररथाचे विशेष आकर्षण होते.स्वामीजींचे भाविकांनी मनोभावेपूजा करून दर्शन घेतले. शोभायात्रेत गोविंदसेवक दत्तात्रेय भांबारे यांनी तयार केलेले विविध चित्ररथ, त्र्यंबकबाबा भगत, साखरे महाराज तसेच विंचूर बॅण्डपथक, महावीर जैन वसतिगृह अधीक्षक डी.एफ. कोल्हापुरे, महावीर विद्यालयाचे प्रभाकर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लेजीम पथके सहभागी झाली होती.
विद्यादान हेच सर्वोत्तम दान: घनश्यामाचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:59 IST
विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगावच येथे प्रवचनात केले.
विद्यादान हेच सर्वोत्तम दान: घनश्यामाचार्य महाराज
ठळक मुद्देलासलगावी बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव