शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद  निवडणूक :  नाशिकमध्ये तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:31 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि. ७) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि. ७) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.  विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेज कोकणी यांच्यावर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु कोकणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला अर्ज कायम ठेवल्याने पक्षीय बलाबल व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेज कोकणी  यांच्यातच तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अ‍ॅड. सहाणे यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही अ‍ॅड. सहाणे यांनी पक्षीय बलाबल तुलनेत कमी असताना आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असतानाही कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने या लढतीत चुरस निर्माण झाली आहे.युतीच्या मतांची विभागणी शक्यशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अ‍ॅड. शिवाजी सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी अ‍ॅड. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज असून, शिवसेना भाजपाने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे परवेज कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक