शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

Video: विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थांनी दिलं जीवदान; पर्यावरणदिनी कौतुकास्पद कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 15:08 IST

सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात आज( दि.५ ) पर्यावरण दिनीच सकाळी  विष्णू पंडीत कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे जिवन कापडी यांना आढळून आले.

नायगाव (नाशिक) - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विहिरीत पडलेल्या मोराला गावातील युवकांनी बाहेर काढून जिवदान दिले.जागतीक पर्यावरण दिनी मोराला जिवदान दिल्याने ग्रामस्थांनी युवकांचे कौतुक केले आहे.

सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात आज( दि.५ ) पर्यावरण दिनीच सकाळी  विष्णू पंडीत कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे जिवन कापडी यांना आढळून आले. सदर विहीर १७ ते १८ फूट पाण्याने भरलेली असल्याने एकट्याला जिवंत मोराला बाहेर काढता येत नसल्याचे बघून  त्यांनी सरपंच दत्ताराम डोमाडे यांना माहिती दिली.तसेच शेजारील शेतकरी यादव कापडी,सोपान कापडी,योगेश विष्णू कापडी,सोमनाथ आव्हाड,शरद कापडी,सचिन कापडी,गणेश कापडी आदी तरुणांच्या मदतीने  विहिरीत उतरून सदर मोराला विहिरीच्या बाहेर काढले. मोर कुठे जखमी नसल्याचे बघून त्यास नंतर दगड्या मळ्यातील वन विभागाच्या हद्दित सोडुन देण्यात आले.

दरम्यान देशवंडी,जायगाव,वडझिरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोरांसह अन्य पक्षी,प्राण्यांचा वावर वाढला आहे.वनविभाच्या जंगलात पाणी मिळत नसल्याने मोर पाणी पिण्यासाठी येत असल्याचे बोलले जात आहे.आज" जागतिक पर्यावरण "या दिवशी राष्ट्रीय पक्षी" मोर" यास जीवदान देऊन चांगला संदेश दिल्याने या युवकांचे सरपंच डोमाडे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहे.