ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 13 - दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या रचना हायस्कूलच्या अक्षता पाटील या विद्यार्थिनीने 10 वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत 99.80% मिळवले आहेत. नाशिकच्या रचना विद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षताचे आई-वडील शिक्षक असून, त्यांचे चांगलं मार्गदर्शन मिळाल्याचे अक्षताने सांगितले आहे. पुढे करियर म्हणून शासकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा मानस असल्याचं तिने सांगितले. दरम्यान, राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. राज्याच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नापास झालेल्या विद्यार्थींची फेरपरीक्षा 18 जुलैला घेण्यात येणार आहे.
VIDEO : नाशिकच्या अक्षता पाटीलला दहावीत 99.80 टक्के
By admin | Updated: June 13, 2017 19:03 IST
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 13 - दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या रचना हायस्कूलच्या अक्षता पाटील या विद्यार्थिनीने 10 वीच्या परीक्षेत उज्ज्वल ...
VIDEO : नाशिकच्या अक्षता पाटीलला दहावीत 99.80 टक्के
https://www.dailymotion.com/video/x8453mh