शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळी

By admin | Updated: November 15, 2015 23:25 IST

निसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरू

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळीनिसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरूअझहर शेख ल्ल नाशिकदीपावलीचा सण हा सर्वांत मोठा उत्सव असला तरी तो जल्लोषात साजरा करताना पर्यावरणपूरकच साजरा करावा यासाठी भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सर्वत्र फटाक्यांच्या धडाक्यामुळे होणारे प्रदूषण हे मानवी आरोग्यास अपायकारक ठरतेच, परंतु त्यापेक्षाही भीषण प्रकार पशु-पक्ष्यांच्या बाबतीत घडतात. यंदाही दिवाळीत झालेल्या आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण- उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही चोरी-छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धुमधडाक्यामुळे पक्ष्यांना हादरे सहन करावे लागत आहेत. शांत निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणारा सजीव म्हणजे पक्षी. पक्ष्यांना फटाक्यांचा आवाज किंबहुना मोठ्या आवाजाची अजिबात सवयच नसते. त्यामुळे प्रकाशाच्या दीपावलीचा उत्सव सुरू झाला की फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायू प्रदूषण पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच पक्षी बिथरतात आणि घबराट होऊन काही मृत्युमुखी पडतात, तर काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात; मात्र त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. कारण रात्रीच्या अंधारामुुळे विहार करताना अडथळ्यांचा अंदाज पक्ष्यांना येत नाही. परिणामी कृत्रिम अडथळ्यांवर आदळ-आपट होऊन पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात, तर काही मृत्युमुखी पडतात आणि बहुसंख्य पक्ष्यांना कायमस्वरूपी बहिरेपणाचाही सामना करावा लागतो; मात्र या सर्व धोक्यांचा स्वार्थी मानवप्राण्याकडून कसलाही विचार होताना दिसत नाही. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये यासंदर्भात अनेक संस्थांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे आता पक्षिप्रेमींनी याबाबत मोहिमा राबविण्याची गरज असून तशी चळवळ नाशिकमध्ये सुरू करण्यात आल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.