शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

टोळीने केली हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:46 IST

जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून अन्य सात ते आठ शिकारी आपल्या दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश

जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून अन्य सात ते आठ शिकारी आपल्या दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत.गेल्या वर्षभरापासून मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर गुजरात राज्यातील काही मजूर कामावर असून, हे मजूर अहवा जि. डांग (गुजरात राज्य) येथील सहकाऱ्यांना या परिसरात रात्री बोलावून हरणांची शिकार करीत असल्याचा सुगावा येथील ग्रामस्थांना लागला होता. त्यामुळे ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवून होते.दरम्यान काल (रविवारी) मध्यरात्री गुजरात पासिंगच्या काही मोटार सायकली संशयीतरित्या जंगलालगत उभ्या असल्याचे व रस्त्यालगच्या अवैध गावठी दारूच्या अड्यावर काही जण नशा करीत असल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तोपर्यंत ग्रामस्थांनी पाचही दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीत जमा केल्या. ग्रामस्थांनी व वनकर्मचा-यांनी दारू अड्ड्याचा मालक जिभाऊ आहिरे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांना तीन वर्षीय चिंकारा नर जातीच्या हरणाची शिकार केलेली आढळून आली. यावेळी येथे उपस्थित संशयितांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. नागरिकांनी पाठलाग करत तीन जणांना ताब्यात घेतले. आरोपी हत्यारबंद असतांनाही नागरिकांनी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी जिवाची पर्वा न करता तीन आरोपींना पकडले, मात्र अंधाराचा फायदा घेवून सात आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. तिन्ही आरोपीना नागरिकांनी चोप देत पाच दुचाकी, कोयता, हरण शिजविण्याचे साहित्यासह वनविभागाच्या स्वाधीन केले. या आधीही या टोळक्याने हरणांची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून जंगलात हरणांसह मोरांचा व जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. त्यातच दुष्काळाच्या झळा वन्यप्राण्यांना बसु लागल्याने पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. याचाच फायदा घेऊन शिकारी आपला कार्यभार साधत असल्याचे समोर आले आहे. याच परिसरात वीस ते पंचवीस हरणाच्या कळपाचा वावर असून, दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीही या भागात संशियतरित्या फिरणारी बोलेरेगाडी मध्यरात्रीच्या सुमारास अडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. यावेळी रस्त्यावर आडवी केलेल्या बैलगाडीला धडक देऊन संशयितांनी पळ काढला होता.अटक केलेल्यांची नावे - जिभाऊ तुळशीराम आहिरे (६०) रा. अंबासन ता.बागलाण, शैलेश सोन्या बागुल (२२) रा. करंजटी ता. अहवा जि.डांग (गुजरात), तुळशीराम सखाराम पवार (३०) रा. करंजटी ता.अहवा जि.डांग (गुजरात) तर परवीश मंगा चौधरी, सुरेश मुरली वारळी, पिंट्या मगन वारळी, धर्मेश आडगू, शिवमन उमेश वारळी, ईश्वर गंगाराम गावित, अश्विन गंगाराम गावित सर्व राहणार कंरजटी ता. अहवा जि. डांग (गुजरात राज्य) हे अंधारात फरार झाले. वनविभागाने घटनास्थळाहून जीजे. ३० बी १७४४, जीजे १५ एके ४२३८, जीजे ३० बी ३००४, जीजे ३० सी २०१६, जीजे ३० बी ०२४२ या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.